नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१८ मे) उत्तराखंडातील केदारनाथाचे दर्शन घेतले मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विशेष पूजा देखील केली. यानंतर मोदींनी त्यानंतर तब्बल दोन किलोमीटर पर्यंतचा रस्ता त्यांनी पायी पार करत ते केदारनाथ येथील गुहेत पोहोचले असून तेथे ते ध्यानधारणेला बसले आहेत.
Sources: Prime Minister Narendra Modi trekked 2 kms to the cave and on request of media allowed cameras to make initial visuals. PM will begin his meditation in a few hours which will last till tomorrow morning. No media or personnel will be allowed in the vicinity of the cave. https://t.co/8K3ZnE29kC
— ANI (@ANI) May 18, 2019
मोदींची ही ध्यान धारणा रविवार (१९ मे) सकाळपर्यंत चालणार असल्याचे म्हटले जाते आहे. यानंतर मोदी बद्रिनाथचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मोदी आज (१८ मे) सकाळी डेहराडूनच्या जॉलीग्रांट विमानतळावर पोहोचले. आणि यानंतर वायुदलाच्या हेलिकॉप्टरने ते केदारनाथला असून केदारनाथ मंदिरात पंतप्रधानांनी विशेष पूजा व रुद्राभिषेक केला आहे. मोदींच्या केदारनाथ वारीदरम्यान सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. तसेच ध्यान धारणा करत असताना मीडिया प्रतिनिधींना तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.