HW News Marathi
राजकारण

“आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केले”, राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई | “आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केले आहे”, असा आरोप शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केली आहे. विधानसभेत आदित्य ठाकरेंनी राहुल शेवाळेंचे लग्न वाचविल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर शेवाळेंनी आज (25 डिसेंबर) पत्रकार परिषदे घेऊन सदर महिलेचा दाऊदच्या गँग असल्याने या प्रकरणाची चौकशी एनआयएच्या (NIA) माध्यमातून व्हावी, अशी विनंती त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

राहुल शेवाळे म्हणाले, “आयुष्यातून उठविण्याचे काम युवा सेना प्रमुखांनी केलेले आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्या पाठिशी आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचे दाऊद गँगशी संबंध आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्यामुळे आज तुरुंगात आहे. आणि त्या  नवाब मलिक यांचे वकिलांशी बोलणे चालू होते. मध्ये एक एजन्ट आहे, त्याने नवाम मलिकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. ज्या महिलेचा अन्सारी वकिली आहे. त्यांनी बोलताना नवाब मलिकांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे.”

महिलेचा दाऊद गँगशीसंबंध 

महिलेचा दाऊद गँगशीसंबंध असल्याचा दावा करत राहुल शेवाळे म्हणाले, “सदर महिलेची संपूर्ण पाकिस्तानात ग्रुप आहे. सदर महिला फराह म्हणून पाकिस्तानी महिला सुद्धासोबत आहे. राशिद म्हणून पाकिस्तानी एजन्ट आहे. आणि दुसरी महत्वाची माहिती मी देतोय, सदर महिला ही दाऊद गँगसोबत काम करते. दाऊद गँगशी संबंधित आहे. जावेद चोठानी यांचा मी फोटो दाखवित आहे. रईस हा दाऊदसाठी काम करतो. या दोघांबरोबर सदर महिलेचे संबंध आहेत. त्यामुळे हे प्रकरण वर वर पाहाता, हे प्रकरण छोटे नाहीय. हे प्रकरण दाऊद गँगशी संबंधित आहे. आणि सदर महिला मी खातरी करून सांगतो की, सदर महिला ही दाऊद गँगसोबत आहे. या दोघांनाही ही ती परिचित आहे. त्यामुळे हे प्रकरण साधेसुधे प्रकरण नाही. हा संपूर्ण आतंरराष्ट्रीय कट आहे,” असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

दाऊदशी संबंध असलेल्या महिलेला आदित्य ठाकरे पाठिशी घालतात

महिलेसंदर्भात बोलतान राहुल शेवाळे म्हणाले, “ही सदर महिला फराह पाकिस्तान आहे. या महिलेसोबत दोन वेळा कराचीलाही जाऊन आलेली आहे. त्यामुळे हे पाकिस्तान कनेक्शन, दाऊद गँगचे कनेक्शन त्यामुळे हे प्रकरण अत्यंत वेगळे प्रकरण आहे. आणि दाऊद गँगशी संबंध असलेली महिला या महिलेला आमचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे पाठिशी घालत आहेत. आदित्य ठाकरेंनी या प्रकरणाचा उल्लेख विधानसभेत केलेला आहे. यामुळे काय लग्न वाचते का?, असा उलट सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंला केला आहे.”

एनआयएमार्फत चौकशी व्हावी

पत्रकार परिषदेत राहुल शेवाळेंनी ऑडिओ क्लिप ऐकवित म्हणाले, “ही सगळी ऑडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी पुरावा आहे. या प्रकरणाची संबंधित माझ्याकडे भरपूर पुरावे आहे. हे संपूर्ण कटकारस्तान मी जसा बोललो यांच्याशी पाकिस्तानची लिंग आहे. दाऊत गॅगशी लिंक आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एनआयएच्या माध्यमातून करण्यात यावा. आणि एनआयएच्या माध्यमातून हे अंतरराष्ट्रीय रॅकेटचा पडदा फाश होईल.@

Related posts

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk

“स्वत: चे महत्व वाढवून घ्यायचे, काही लोकांना सवय असते”, उपमुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोमणा

Aprna

जर राहुल गांधी पंतप्रधान झाले तर देशाचे कार्टून नेटवर्क होईल !

News Desk