नवी दिल्ली | राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात आज (३० मे) सायंकाळी ७ वाजता, नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि ‘मोदी २.०’ पर्वाला प्रारंभ होणार आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन शहीदांना वंदन केले.
#WATCH Prime Minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat. Later today, President Ram Nath Kovind will administer the oath of office and secrecy to PM Modi. pic.twitter.com/5LbxQBuhkW
— ANI (@ANI) May 30, 2019
देशातील जनतेने भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल मिळवून सत्तेवर आलेले आहे. या ‘एनडीए’ सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार? याची जनतेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजधानी दिल्लीत बुधवारी (२९ मे) खलबते, चर्चा आणि गाठीभेटीचे सत्र सुरू होते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यानंतर इतर मंत्र्यांना पद व गोपनीयतेची ते शपथ देतील. मोदी सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्ता स्थापन करून पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या पंक्तीत स्थान मिळवलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी इनिंग आजपासून सुरू होत आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi and Bharatiya Janata Party President Amit Shah pay tribute at Sadaiv Atal Samadhi, the memorial of late Prime Minister Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/AjOev0ksJP
— ANI (@ANI) May 30, 2019
या शपथविधी सोहळ्याला आठ हजार मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार असून आजवरचा हा सर्वात मोठा आणि भव्य शपथविधी सोहळा असणार आहे. २०१४ ला ५००० पाहुणे उपस्थित होते. सायंकाळी ७ ते रात्री ८.३० असा ९० मिनिटे शपथविधी सोहळा चालणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. त्यानंतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi pays tribute at the National War Memorial in Delhi. Army Chief Gen. Bipin Rawat, Navy Chief Admiral Sunil Lanba and Vice Chief of Air Force Air Marshal RKS Bhadauria also present. pic.twitter.com/Pr4Vs5XLQQ
— ANI (@ANI) May 30, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.