नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१७ सप्टेंबर) ६९ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान मोदी गुजरात या त्यांच्या राज्यांमध्ये वाढदिवस साजरा करणार आहे. यावेळी ते नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर बंधाऱ्याची पाहणी करणार असून केवाडियामध्ये एका कार्यक्रमाला मोदी हजर देखील लावणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मोदी हे वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरी जाणार आहेत.
Gujarat: Preparations underway at Kevadiya Dam in Narmada, ahead of Prime Minister Narendra Modi's visit today. pic.twitter.com/WXep3pgbDf
— ANI (@ANI) September 17, 2019
मोदी हे दुसऱ्यायंद झाल्यानंतर त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेणार आहे. त्यानंतर केवाडिया येथील कार्यक्रमाला पोहचतील. हे ठिकाण नर्मदा जिल्ह्यात येते. याठिकाणी ते नर्मदा पूजा होईल त्यात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. पुजेनंतर नरेंद्र मोदी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील. ही जनसभा सकाळी ११ ते १२ वाजताच्या उपस्थितांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर धरणाला तिरंग्याच्या रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे उद्धाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Gujarat: Prime Minister Narendra Modi visits Khalvani Eco-Tourism site in Kevadiya, Narmada district. pic.twitter.com/gQKVqbhvtO
— ANI (@ANI) September 17, 2019
मोदी यांच्या दौऱ्याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ट्विट करुन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केवाडिया येथे होणाऱ्या नमामि देवी नर्मदा महोत्सवात त्यांचे स्वागत केले आहे. यासोबतच भाजपकडूनही नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील आठवडाभर देशभरात विविध कार्यक्रम राबविले जातील. यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहासह अन्य पदाधिकारीही उपस्थित राहतील. या कार्यक्रमात स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.