HW News Marathi
राजकारण

तब्बल २३ तासांनी लागला निकाल, भाजपचे डावखरे विजयी

मुंबई | विधान परीषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणूकीचा निकाल गुरुवारी लागला परंतु कोकण पदवीधर मतदारसंघाचा निकाल अत्यंत रंजक पद्धतीने लागल्याचे पहायला मिळाले. विधान परिषदेच्या चार जागांसाठी ही निवडणुक घेण्यात आली होती. कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपच्या निरंजन डावखरे यांनी बाजी मारली आहे.

निरंजन डावखरे यांनी शिवसेनेच्या संजय मोरे आणि राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांचा पराभव करत या विजयाला गवसणी घातली आहे. निरंजन डावखरे यांना ३२ हजार ८३१ तर संजय मोरे यांना २४ हजार ७०४ मते मिळाली आहेत. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून भाजपात उडी मारल्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची ठरली होती.

गुरुवारी सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली होती, मात्र सातत्याने घेतले जाणारे आक्षेप आणि मतपत्रिकांमधील घोळामुळे मतमोजणीत वारंवार खंड पडत होता. अखेर आज सकाळी पावणेसातच्या सुमारास हा निकाल जाहीर करण्यात आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कसा घडेल हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच ना! – अजित पवार

Aprna

यंदा आपल्याला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करायचा आहे !

News Desk

विधासभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेला काँग्रेसच्या युवा चेहऱ्यांची ओळख

swarit