HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले

वाराणसी | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (२४ फेब्रुवारी) प्रयागराज येथे जाऊन कुंभमेळ्यात सहभागी झाले. मोदींनी गंगा नदीत स्नान करून संगम घाटावर विधिवत पूजा देखील केली. कुंभ मेळ्याला भेट देणाऱ्या २२ कोटी लोकांमुळे सफाईचे मोठे आव्हान होते. परंतु, या सपाई कर्मचाऱ्यांनी जगात अशक्य काहीच नाही, हे सपाई करून सिद्ध केले आहे. कुंभमेळ्यात सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे चक्क पाय धुतले. मोदींचा पाय धुतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोदीचा आज एक दिवसीय उत्तर प्रदेश दौऱ्यार होते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी गौरखपूर शेतकरी सन्मा योजनेतील पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २ हजार रुपयांचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला.

मोदींनी कुंभमेळ्या भेटदरम्यान अक्षयवडाची पूजा करून तेथील हनुमंतांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर, मोदींनी गंगा नदीचीसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुऊन अनेकांना मोठा धक्का दिला. मोदींनी कुंभमेळ्यात स्वच्छता अन् साफ सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाय धुतले, हे पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या. कुंभमेळ्यात स्वच्छता आणि साफसफाईचे काम करून या कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र जपला आहे.

तसेच देशातील नागरिकांसमोर स्वच्छतेचा सर्वात मोठा आदर्श ठेवला आहे. त्यामुळे आपण त्यांची सेवा करणे, हे आपले भाग्य समजतो, असे मोदींनी म्हटले. या सफाई कार्मचाऱ्यांना मोदींनी एका खुर्चीवर बसविले होते. यानंतर त्यांनी स्वत: जमिनीवर बसून या सफाई कर्मचाऱ्यांचे पायावर पाणी टाकून त्यांचे पाय धुतले आहे. पंतप्रधान मोदींच्या या सेवा सुश्रुषेनंतर तेथील सफाई कर्माचीर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

News Desk

आपल्या विधानानंतर अवघ्या २४ तासातच राहुल गांधींनी दिले हे स्पष्टीकरण

Gauri Tilekar

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला मिळाले ‘ढाल-तलावर’ चिन्ह

Aprna