नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ एप्रिल रोजी वाराणसी येथून अर्ज भरणार आहेत. मोदी यावेळी ते रोड शो देखील करणार असून यात बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार देखील सहभागी होणार असल्याचे माहिती मिळाली आहे. त्यासाठी भाजपने जय्यत तयारी केली आहे. मोदींचा रोड शो १० किलोमीटरपर्यंत निघणार आहे. त्यापूर्वी मोदी २५ एप्रिल रोजी गंगा पूजा आणि आरती सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, पीयूष गोयल हे देखील रोड शो मध्ये सहभागी होणार आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी असाच मोठा रोड शो आयोजित केला होता. या रोड शो मध्ये ५ लाख लोक सहभागी झाले होतील, आता पुन्हा हेच लक्ष्य भाजपने ठेवले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगला होता. यावेळी वाराणसीतून प्रियांका गांधी वॉड्रा मोदींना आव्हान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप यावर काँग्रेसकडून अंतिम निर्णय घेण्यात आला नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.