HW Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांचा उपस्थित राहण्यास नकार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (१९ जून) ‘एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी देशातील सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक बोलावली आहे. संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये दुपारी ३ वाजता ही बैठक पार पडणार असून या बैठकीत देशातील राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे या बैठकीला उपस्थित राहणार का ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

“एक देश एक निवडणूकसारख्या गंभीर विषयावर योग्य उत्तर मिळाले पाहिजे. या विषयावर चर्चा करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही. एवढ्या कमी वेळात या विषयाला योग्य तो न्याय मिळू शकणार नाही. राज्यघटनेची संपूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्ती, निवडणूक तज्ज्ञ आणि सर्वपक्षीय सदस्य यांच्यात चर्चा होणे आवश्यक आहे”, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या या सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. “घाई करण्यापेक्षा या विषयावर श्वेतपत्रिका काढून सर्व पक्षांची मते मत मागवा.

“तुम्ही असे केलेत तरच या प्रकरणी आम्ही तुम्हाला काही ठोस सूचना देऊ शकतो”, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘एक देश एक निवडणूक’ हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याच, विषयावर चर्चा कारण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. मात्र, अनेक विरोधी पक्षांनी ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना नाकारली आहे. मात्र, या बैठकीस उपस्थित राहण्यास काही पक्षांच्या प्रमुखांनी नकार दिला आहे तर काही पक्षप्रमुखांनी स्वतः उपस्थित न राहता आपला प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

अद्याप शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात

News Desk

नाथाभाऊ पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

News Desk

राज्यात आज ८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद  

News Desk