HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. रवींद्र धंगेकरांनी आज (6 मार्च) शरद पवार यांचे पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यावेळी शरद पवारांनी रवींद्र धंगेकरांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

कसब्यातील दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुका लागल्या होत्या. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेवार रवींद्र धंगेकरांनी 10 हजार 940 मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निकालानंतर रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची देखील भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

 

रवींद्र धगेकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

Related posts

लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचे निधन

News Desk

दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण

News Desk

संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

Aprna