नवी दिल्ली | प्रियांका चतुर्वेदी यांनी १९ एप्रिल रोजी काँग्रेसला जोरदार झटका देत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. मात्र, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणते पद मिळणार याबाबत चर्चा रंगत होत्या. आता अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड केली आहे. प्रियांका यांनी ट्विट करत आपली उपनेतेपदी निवड केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
Shiv Sena has appointed Priyanka Chaturvedi as the "Upneta" of the party. (File pic) pic.twitter.com/kDe5KlfXHq
— ANI (@ANI) April 27, 2019
Thank you Uddhav Thackeray ji for giving me an organisational role and responsibility, so as to contribute to the party to the best of my ability. @ShivSena pic.twitter.com/gaGzBy6bzb
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) April 27, 2019
प्रियांका चतुर्वेदी यांच्या मथुरा येथील राफेलसंदर्भातील पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रियांकाशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार केल्यानंतर त्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी जोतिरादित्य सिंधिया यांनी हस्तक्षेप करत या पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले. इतकेच नव्हे तर त्यांना पुन्हा त्यांची पदे देखील दिली. त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, पक्षातील या गैरवर्तनामुळेच प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.