मुंबई | प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज (१९ एप्रिल) रोजी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट शेअर केला आहे. मी गैरवर्तनांमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याची कबुली प्रियांका चतुर्वेदी यांनी मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. गेल्या १० वर्षापासून नि: स्वार्थीपणे काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे. मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडलेला नाही, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या.
Priyanka Chaturvedi: I know I will be held accountable for my past statements and my views and that how I came to this conclusion but I would like to say that this decision of joining Shiv Sena I have taken after a lot of thought pic.twitter.com/2BuzaSCmas
— ANI (@ANI) April 19, 2019
मी खूप विचारपूर्वक शिवसेनेत सामील होण्याच विचार केल्याचे प्रियांका चतुर्वेदींनी पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्वीटरवर ट्वीट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी लिहिले आहे.
प्रियांका चतुर्वेदी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले
- प्रियांका यांच्या कुवत आणि बुद्धीमत्तेचा विचार करून प्रियांका यांना जबाबदारी देण्यात येईल – उद्धव ठाकरे
- एक चांगली बहिण शिवसैनिकांना मिळाली आहे, त्या लढवय्या आहेत- उद्धव ठाकरे
- मी मुंबईकर असल्याने मला शिवसेनेबाबत पूर्वीपासून आत्मीयता वाटत आली आहे.
- मला होणारा त्रास मी पक्षनेतृत्वाला कळवला होता, ज्यांनी मला त्रास दिला त्यांना निलंबित केल्यानंतर पुन्हा पक्षात घेतले याचा मला जास्त त्रास झाला
- मी मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितले नव्हते -प्रियांका चतुर्वेदी
- मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडलेला नाही-प्रियांका
- शिवसेनेला फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात जिथे मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन
- मी अत्यंत विचारपूर्वक माझा निर्णय घेतला आहे- प्रियांका चतुर्वेदी
- मी गैरवर्तनांमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याची कबुली प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
- प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला खंबीर करण्याचा प्रयत्न , मग ते मुंबई, महाराष्ट्र असो किंवा देश अथवा बिहार असो, मी शिवसेनाला खंबीर करण्याचा प्रयत्न करणार
- मी खूप विचार करूनच शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चिय केला आहे.
- शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माझ्यावर अनेक टीका होणार आहे.
- एका महिलेने गेल्या १० वर्षात पक्षात नि:स्वार्थी सेवी केल्यानंतर माझ्या हाती काहीच नाही आले
- मला खूप सन्मांनी शिवसेने मला त्यांच्या कुटुंबात सामावून घेतले आहे.
- २६/११ नंतर मी राजकारणार सामील होण्याहोऊन लोकांची सेवा करण्याच निर्णय घेतला आहे
- मी मुंबईकर होण्याच्या नेत्याने मी शिवसेना सामील झाली आहे.
- मुंबई सारखे १० शहरे मी देशभरात निर्माण करण्याची माझी इच्छा
- महिलांची सुरक्षा आणि युवा या दोन मुद्द्यांच्या आधार घेत सेनेत प्रवेस केला
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश
- प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
- प्रियांका यांचे मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो– उद्धव ठाकरे
- प्रियांका यांना शिवसेना हा योग्य पक्ष वाटला-उद्धव ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.