HW News Marathi
राजकारण

स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनसेने केलेलीच कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले !

नाशिक | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातात सत्ता असताना जाहीरनाम्या नसलेल्या गोष्टी आम्ही करून दाखविल्या असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनसेने केलेलीच कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले. भाजपचा हा खोटारडेपणा नाशिकच्या वर्तमानपत्रांनी सत्य बाहेर काढले. कोणत्या गोष्टींवर या सरकारला मार्क द्यायचे?, असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आज (२६ एप्रिल) झालेल्या जाहीर सभेतून केला आहे. या सभेत नाशिकमधील महिलांची पाण्यासाठी होत असलेली वणवण राज यांनी जाहीर सभेत व्हिडिओ दाखवित सरकारची पोल खोल केली आहे.

तसेच पुढे राज ठाकरे असे देखील म्हणाले की, जलसंपदामंत्री याच जिल्ह्यातले आहेत ना, मग आजही महाराष्ट्र पाण्यासाठी वणवण भिरतोय. फडणवीसांनी एक लाख वीस हजार विहिरी बांधल्या सांगतायेत, मग पाणी कुठेय, असाही प्रश्न राज यांनी विचारला. अमित शाह सांगलीत म्हणाले होते की, ७२००० कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले? तुम्ही सत्तेत होतात मग तुम्हीच उत्तरे द्या? भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात जलसिंचनाची नक्की काय कामे केली? हे कधी ते सांगणार आहेत?, सवाल राज ठाकरेंनी अमित शहा यांना केला होता.

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • निवडणूक ह्या देशात लोकशाही टिकणार आणि हुकूमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे हे विसरू नका. मोदी-शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवण्यासाठीची ही निवडणूक आहे हे विसरू नका
  • जे हिटलर करत होता तेच मोदी करत होता. हिटलर तेंव्हा सिनेमे बनवत होता आणि इथेपण सुरू आहे ‘पॅडमॅन’, टॉयलेट एक प्रेम कथा असे सिनेमे निघत आहेत.
  • सीबीआय, आरबीआय, सर्वोच्च न्यायालय सारख्या स्वायत्त संस्थांवर नरेंद्र मोदी सरकारने पूर्ण अंकुश आणला आहे.
  • व्यापारी हा सैनिकांपेक्षा अधिक शूर असतो असे मोदी म्हणाले होते.
  • अशा लोकांना मोदींनी लोकसभेचे भोपाळमधून तिकिट देतो इतकेच नव्हे तर त्यांच्या विधानाचे समर्थन मोदी-शाह करत आहेत
  • ही जवानांबद्दलची पंतप्रधानांना साधवी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या की, शहीद हेमंत करकरे, माझ्या शापाने ही लोके गेली.
  • अटलजींनी कधीही कारगिल युद्धाचे राजकारण केले नाही.
  • मोदी बालाकोट एअरस्ट्राइक करणाऱ्या वैमानिकांच्या शौर्यावर मते मागत आहेत.
  • मोदी नवमतदारांना आवाहन करत आहेत की तुमचे पहिले मत पुलवामा शहीदांसाठी आणि बालाकोटच्या वैमानिकांसाठी द्या. पंतप्रधानांना लाज नाही कशी वाटत नाही.
  • हे लोके तुम्हाला जातीत-आरक्षणात गुंतवणार, आरक्षणातून नोकऱ्या मिळतील अशी खोटी स्वप्न दाखवायची, मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? पण तरीही तुम्हाला ह्यातच गुंतवायचे, तुम्हाला वापरतील, मतदान झाले की तुम्हाला विसरून जातील इतकी नीच माणसे आहेत.
  • नरेंद्र मोदी गोरक्षाच्या नावाखाली दलित तरुणांना उना मध्ये बेदम मारहाण झाली, त्या तरुणांनी गाय मारली नव्हती तर मृत गायीचे कातडे काढायला लोकांनी बोलावले म्हणून ते तरुण गेले.त्या तरुणांचा काय दोष होता? गोरक्षाच्या नावाखाली ४०,५० लोके मारली गेली, त्यावर आपण कधी का नाही बोललात?
  • मोदींनी जातीयवादाचे कार्ड काढले आणि म्हणतात की, मी खालच्या जातीचा असल्यामुळे माझ्यावर काँग्रेस आणि विरोध पक्षनेते मला टीका करत आहे, म्हणजे सरकारला प्रश्न विचारला की यांना जातीचे आठवण येते.
  • २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे नेते, रॉबर्ट वाड्रा हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांना जेल मध्ये टाकू असे म्हणाले होते.
  • सत्तेत आल्यावर अमित शाह म्हणाले की रॉबर्ट वाड्रा यांना जेलमध्ये टाकू असे कधीच बोललो नव्हतो, असे एका कार्यक्रमाती एक व्हिडिओ राज ठाकरे यांनी मचावर दाखविला
  • देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणण्यासाठी टास्कफोर्स तयार करू, जो काळा पैसा भारतात आणू, त्यातून नोकरदार वर्गाला त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल काही पैसे परत करू असे मोदी म्हणाले होते.
  • पुढे सत्तेत आल्यावर अमित शाह म्हणाले की १५ लाख खात्यात जमा करू हा चुनावी जुमला आहे. देशाला मूर्ख बनवतात
  • नरेंद्र मोदींनी जी जी स्वप्न दाखवली त्यावर मोदी काही बोलायला तयार नाहीयेत.
  • आणि ५ वर्षानंतर मोदी मते मागत आहेत पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या जीवावर, बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करणाऱ्या वैमानिकांच्या जीवावर
  • २०१६ नंतर देशात बलात्कारांचे गुन्हे किती झाले, बेरोजगारीचे प्रमाण काय आहे
  • या आकडे बाहेर येऊ दिले जात नाहीयेत. माध्यमांना दाबून टाकलंय, खऱ्या गोष्टी बाहेर येऊ दिल्या जात नाहीयेत.
  • एचएएलच्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला त्यांना हजार कोटींचे कर्ज काढावे लागले, एचएएल कंपनी सक्षम असताना कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच काम दिले गेले, पण एचएएल का नाकारलं गेलं?
  • नोटबंदी आणि जीएसटीमुळे साडेचार ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या.
  • रोजगार द्यायला सत्तेत येणार असे म्हणाला होतात ना?
  • रोजगार निर्माण करणे सोडाच पण उलट मोदींनी अचानक नोटबंदी जाहीर केली. या नोटबंदीच्या काळातील एक चित्रफीत दाखवून त्यावेळची भयानक परिस्थिती लोकांना सांगण्याच प्रयत्न केला
  • . बँकाच्या रांगेत उभे असलेल्याना लाठ्या मारल्या गेल्या? देशाला कळत नव्हते का हा निर्णय का घेतला?
  • आज शेती तोट्यात आहे म्हणून शेतकरी कुटुंबातील मुले,मुली शेती सोडून आज नोकरीच्या शोधात फिरत आहेत.
  • या तरुण-तरुणींना मोदींनी २०१४ ला आश्वासनने दिली होती की आम्ही दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ. पण पुढे झाले काय? किती नोकऱ्या दिल्या गेल्या?
  • आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचं भांडवल करून हे सत्तेत आले आणि ह्याच शेतकऱ्यांविषयी भाजपचे नेते वाट्टेल ती विधानs करत होते. यात केंद्रीय कृषीमंत्र्यांपासून ते राज्यातील नेत्यांपर्यंत सगळे आहेत.हा सत्तेचा माज आहे
  • १४ हजार शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या काळात आत्महत्या केली
  • शेतकऱ्यांनी कसे जगायचे? दत्तक घेतो म्हणणारे मुख्यमंत्री पळून जातात.
  • मोदी जेव्हा नाशिकमध्ये येतात, तुमची भेट घेतात आणि तुम्हाला आश्वासन देतात, आणि तुम्ही त्या आशेवर मतदान मिळतो, मग तुमच्या हातात काय येते
  • कांदा उत्पादनाची भेट घतली ते म्हणाले की, यांचे आता काही होऊ शकत नाही.
  • अमित शाह सांगलीत म्हणाले होते की, ७२००० कोटींच्या घोटाळ्याचे काय झाले? तुम्ही सत्तेत होतात उत्तरे द्या? भाजप-शिवसेनेच्या सत्तेच्या काळात जलसिंचनाची नक्की काय कामे केली? हे कधी ते सांगणार आहेत?
  • आधीच्या सरकारच्या काळात मीच तेंव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत होते.
  • त्यावेळी सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचारावर भाजपचे नेते घसा फोडून ओरडत होते.
  • पण सत्तेत आल्यावर देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप होते ते सुनील तटकरे आणि अजित पवारांवर का नाही कारवाई झाली
  • नाशिकच्या जवळच्या तालुक्यातील गावात जीवावर बेतून पाणी भरत आहेत. काय झालं त्या विहिरींचे
  • नाशिकमध्ये नरेंद्र मोदींनी येऊन कांदा उत्पादकांना भाव देऊ असे सांगितले
  • देवेंद्र फडणवीस २ वर्षांपूर्वी म्हणाले की आम्ही १२०००० विहिरी बांधल्या. तरीही २८,००० गावे आज दुष्काळग्रस्त आहेत.
  • मोदी जेव्हा नाशिक मध्ये आले तेव्हा म्हणाले की, नाशिकच्या कांद्याला भाव देऊ
  • स्मार्ट सिटीच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलीच कामे भाजपने आम्ही केली असे दाखवले.
  • या बातम्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. कोणत्या गोष्टींवर ह्या सरकारला मार्क द्यायचे?
  • नाशिककरांनी जो द्यायचा तो निर्णय दिला. त्याचं वाईट वाटलं पण जी कामे केली ती छातीठोकपणे सांगितली.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखे, नाशिक दत्तक घेतो असली खोटी आश्वासने दिली नाही.
  • मला सांगा दत्तक घेतलेल्या काय केले ह्या बापाने
  • नाशिकच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात आम्ही ५१० किमीचे अंतर्गत रस्ते बांधले,वाहतूक बेटे,चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक, घनकचरा प्रकल्प,जलशुद्धीकरण प्रकल्प,मलजल प्रक्रिया केंद्र, मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना, प्रकल्प राबवले
  • अनेक वर्षापासून ज्याकडे नाशिक महानगर पालिका होती, त्यांनी देखील जेव्ही कामे केली नाहीत तेवढी कामे मनसेने केले आहेत
  • नाशिक हे देशातील एकमेव शहर असेल जिथे उद्योगपतींनी सीएसआरमधून पैसे खर्च करून अनेक प्रकल्प उभारायला मदत केली आणि ते देखील फक्त ५ वर्षात.
  • नाशिकमध्ये आम्ही सत्तेत असताना आमच्या जाहीरनाम्यात ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्यादेखील करून दाखवल्या.
  • सत्तेत बसलेल्या पक्षाने निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासने पूर्ण करायची असतात, पण जर तुम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण होणार नसतील
  • तर मग तुम्ही का मतदान का करायचे? चांगले शिक्षण, नोकरी, चांगले रस्ते, वीज, पाणी, मैदानं ह्यापलीकडे लोकांना काय हवे असते?
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकच्या  विकासासाठी काँग्रेसला विजयी करा

News Desk

कॉंग्रेसकडून भारत बंदचे आवाहन, मुंबईत ठिकठिकाणी होणार निदर्शने

News Desk

मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांसाठी दिलेल्या 5 कोटींवरून आदित्य ठाकरेंनी विचारले ‘हे’ प्रश्न

Aprna