HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात लढणार ?

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून लढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. एका इंग्रजी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रियांका गांधी या सध्या राजकारणात प्रचंड सक्रिय झाल्याचे दिसत आहेत. प्रियांका गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून लढवण्याचे संकेत दिले होते.

प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभा, कार्यकर्त्यांचे मेळावे, रोड शो, दौऱ्यांमध्ये बहुतेक वेळा राहुल गांधींसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबतचे अधिकृत वृत्त किंवा कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप काँग्रेसकडून करण्यात आलेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून आपण लढण्यास इच्छुक असल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले असून याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधी घेतील अशी माहिती मिळत आहे.

Related posts

सवर्ण आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत मांडणार

News Desk

राज ठाकरे यांचा मोदी, फडणवीस यांच्यावर घणाघात

News Desk

काश्मीरमध्ये भाजपने ‘भगव्या’चा मोह सोडून ‘हिरवा’ रंग केला आपलासा 

News Desk