HW News Marathi
राजकारण

प्रियांका गांधींच्या ‘रोड शो’दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांची अलोट गर्दी

लखनौ | पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासिचव पद स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधींचा हा पहिला राजकीय दौरा आहे. उत्तर प्रदेशात आज (११ फेब्रुवारी) यांचा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. हा रोड शो दुपारी १२ वाजता सुरू झाला असून १५ किमी असा भव्य रोड शो आहे. दुपारी तीनच्या सुमारास हा रोड शो काँग्रेसच्या कार्यालयात पोहचल्यानंतर समाप्त होणार आहे.

लखनौ प्रियांका गांधींच्या रोड शोला सुरुवात खुल्या बसमधून रोड शो असून रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. विमानतळापासूनच प्रियांकांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पश्चिम उत्तर प्रदेश ज्योतिरादित्य सिंधियामध्ये देखील सामील झाले आहे.

लखनौमध्ये प्रियांका गांधी व ज्योतिरादित्य सिंधिया १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. आगामी तीन दिवसांचा त्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. प्रियांका पहिल्यांदा सीतापूरमधील लोकांशी प्रथम संवाद साधणार आहेत. दुपारी चार ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रियांका, राहुल आणि ज्योतिरादित्य हे प्रदेश काँग्रेस कार्यालयात संपूर्ण उत्तर प्रदेशातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेलगीसह ७ आरोपींची स्टँप घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता

News Desk

“… तर संपूर्ण देशात परिवर्तनाची लहर”; नाना पटोलेंची भविष्यवाणी

Darrell Miranda

…तर काँग्रेसमध्ये एकही माणूस शिल्लक राहणार नाही !

News Desk