HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“आमचे तोंड उघडले तर…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

मुंबई | “आमचे तोंड उघडले. तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. यांचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे नाही”, अशा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली होती. यानंतर रोशनी शिंदेंना ठाण्याचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना भेटण्यासाठी ठाकरे कुटुंबिय रुग्णालयात गेले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना ‘फडतूस’ अशा शब्दाचा वापर करत हल्लाबोल केला होता.

उद्धव ठाकरेंनी आज फडतूस अशा शब्दात तुमच्यावर टीका केली, असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस विचारल्यावर ते म्हणाले, “अडीच वर्षाचा त्यांचा कार्यभार बघितल्यानंतर नेमके फडतूस कोण आहे. हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरे म्हणजे माझा सवाल असा आहे. दोन-दोन मंत्री तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवित नाहीत. जे मुख्यमंत्री मंत्र्यांच्या भवती लाळघोटत असतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. जे वाजेच्या मागे लाळघोटतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. ज्यांच्या काळात पोलीस खंडणी मागतात. त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे. अडीच वर्ष घरात बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकू नये. आमचे तोंड उघडले. तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. यांचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे नाही. ज्या दिवशी बोलणे सुरू करीन,  त्या दिवशी त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला, आणि सगळ्या महत्वाचे असे आहे. हा जो काही त्यांचा थैयथैयाट  आहे. हे जे काही त्यांचे निराशा या नैराश्येला उत्तर देण्याचे काही कारण नाही.”

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले

उद्धव ठाकरे म्हणाले, ” एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार लाळघोटेपणा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री पद मिळाले. म्हणून नुसती फडणवीसी करणारी माणूस गृहमंत्री म्हणून मिरवीत आहे. पण, त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मंदे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. तरी सुद्धा कुठेही हल्ल्यला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चाचलेली आहे.”

संबंधित बातम्या

नुसती ‘फडणवीसी’ करणारा माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय! – उद्धव ठाकरे

 

Related posts

मोदींचा बायोपीक प्रदर्शित होणे आणि विवेक ओबेरॉयच्या घरी रेड पडणे हा नियतीचा खेळः सचिन सावंत

News Desk

“मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन बच्चू कडू यांनी स्वाभिमान गहाण ठेवला”, सुषमा अंधारेंची टीका

Aprna

साध्वी प्रज्ञा यांचा भाजपमध्ये प्रवेश, भोपाळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

News Desk