नवी दिल्ली | भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी प्रचारादरम्यान बाबरी मशीदप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ७२ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली आहे. गुरुवारी (२ मे) सकाळी ६ वाजल्यापासून ही कारवाई लागू होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा गेले अनेक दिवस त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि भाजपकडून मिळालेल्या उमेदवारीमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
EC bars BJP Bhopal candidate Pragya Singh Thakur from campaigning for three days starting 6 am tomorrow. Thakur's remark that she is proud of Babri Masjid's demolition was found violative of the Model Code of Conduct. pic.twitter.com/DMHoF7uR7I
— ANI (@ANI) May 1, 2019
“अयोध्येमध्ये ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली त्यात मी सहभागी होते. त्यावेळी मी सर्वात वरती चढले होते. देवाने मला दिलेल्या या संधीचा मला अभिमान आहे”, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर देखील साध्वी प्रज्ञा आपल्या वक्तव्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने साध्वी प्रज्ञा यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.