HW News Marathi
राजकारण

पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट !

नवी दिल्ली | “पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट होता”, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाघेला यांनी हा आरोप केला आहे. पुलवामा येथील हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी ही गुजरातची होती, असा दावा शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

“पुलवामासारख्या हल्ल्याची भाजप वाट बघत होते का ? बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळाविषयी माहिती असताना देखील भाजपने कारवाई का केली नाही ?” असा सवाल वाघेला यांनी यावेळी केला. “बालाकोट येथील एअर स्ट्राइक हा षडयंत्राचा एक भाग होता. या एअर स्ट्राईकमध्ये एकही दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला नाही. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेला एअर स्ट्राइकमध्ये २०० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सिद्ध करता आले नाही”, असेही वाघेला यावेळी म्हणाले.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काहीच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपचे नेते अशी वाघेला यांची ओळख होती. याआधी वाघेला यांनी काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली होती. २०१७मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : श्रीराम संपूर्ण विश्वाचे तर मग मंदिर केवळ अयोध्येतच का ?

News Desk

मोठे कोण ? मुख्यमंत्री की ते चार अधिकारी !

Gauri Tilekar

“लोकप्रतिनिधींवर विनयभंगाचा गुन्हा लावणे ‘हा’ अतिशय भ्याड हल्ला”, अजित पवारांची संतापजनक प्रतिक्रिया

Aprna