पुणे | ”गल्ली ते दिल्ली तुमचा थाट… शंभर नगरसेवक आमदार आठ… पुण्याच्या पाण्याची लावली वाट”, असे म्हणत भाजपच्या कारभाराला कंटाळलेल्या पुणेकरांनी आपल्या खास शैलीत भाजपला लक्ष्य केले आहे. जलसंपदा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील वादामुळे सामान्य पुणेकरांना पाणी कपातीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच या समस्येला कंटाळलेल्या पुणेकरांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शहरात अशा मजकुराचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
जलसंपदा विभागाला पाणी कपात करायची असेल तर त्यांनी राज्यचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करून त्यानंतरच निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना असा परस्पर निर्णय घेता येणार नाही. पाणीपुरवठ्याच्या पूर्वसूचना न देता पाणी कपात केल्यास पोलिसांत तक्रार करू, असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.