HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पुण्यातील एका झोपडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे | पुणे जिल्ह्यातील पिंपळवाडीत एका झोपडीतून शस्त्रसाठा जप्त केला आहे. शस्त्रसाठा सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसने ही कारवाई करण्यात आली आहे. राजाराम अभंग (६०) असे शस्त्रसाठा तयार करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव असून ते एका झोपडीत राहतात. आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. याप्रकरणी 2003 सालीही अभंग यांच्याकडे असाच शस्त्रसाठा आढळला होता. तेंव्हा त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पुन्हा अभंग यांच्या घरात पोलिसांनी केलेल्या करावाईत राजाराम याच्याकडे ४ पाईप बॉम्ब बनविण्यासाठी तयार केलेले स्ट्रक्चर पाईप, २ इलेक्ट्रिक गन मशीन, गन पावडर, एका तेलकट कागदामध्ये गुंडाळलेले पावडर स्वरुपातील एक्सप्लोझिव्ह (हे स्फोटक असल्याचा सिग्नल श्वानाने दिला आहे़ मात्र, ते कोणत्या प्रकारचे एक्सप्लोझिव्ह आहे, याची माहिती तपासणीनंतर सांगता येईल), २ तलवारी, २ भाले, ५९ डेटोनेटर (त्यात ४ इलेक्ट्रिक, ५५ नॉन इलेक्ट्रिक), इलेक्ट्रिक स्वीच, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी, चिलखत, हेल्मेट असे साहित्य सापडले आहे.

 

 

 

Related posts

हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल !

News Desk

नागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

News Desk

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

News Desk