HW News Marathi
राजकारण

४ आमदारांसह राधाकृष्ण विखे-पाटील लवकरच करणार काँग्रेसला रामराम ?

मुंबई | लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाचा धक्का पचविण्याआधीच आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ४ आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळत आहे. यात अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणे यांचा समावेश आहे. अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

१ ते ६ जूनदरम्यान हा त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होईल, अशी माहिती मिळत आहे. याचसंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळत आहे. विखे पाटील यांच्यासह अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, नितेश राणे यांच्याव्यतिरिक्त आणखी काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. त्यांच्या पक्षप्रवेशदरम्यान दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण…” , चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Aprna

पूर परिस्थिती पाहणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडचिरोलीला रवाना

Aprna

शिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही | धनंजय मुंडे

News Desk