HW Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी ‘जुमला राजा’ तर त्यांची राजवट ‘चौपट राज’

नवी दिल्ली । काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी ‘जुमला राजा’ तर त्यांची राजवट ‘चौपट राज’ अशी टीका राहुल गांधी केली आहे. देशातील शेतकरी व बेरोजगारी यावरून मोदींना लक्ष्य करत राहुल गांधी म्हणाले की, “मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव नाही, युवकांच्या हाताला काम नाही. मोदी आपली आश्वासने
पूर्ण करू शकलेले नाहीत.”

पंतप्रधान मोदी आणि नवीन पटनायक यांनी आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप राहुल गांधींनी केला असून आदिवासींच्या हक्कांचे रक्षण काँग्रेसचं करेल असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. राहुल गांधी हे सध्या ओडीसा दौऱ्यावर आहेत. केंद्र आणि ओडीसातील पटनायक सरकार हे दलित, आदिवासी, शेतकरी, गरीब यांचे भले करण्यात अपयशी ठरल्याची टीका देखील राहुल गांधी यांनी केली. भाजप व बिजू जनता दल केवळ आपल्या उद्योगपती मित्रांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असून गरीब व शेतकऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

 

Related posts

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

पर्रीकरांचे जळूप्रमाणे खुर्चीला चिकटून राहणे ही कोणती नैतिकता !

News Desk

चांद्रयान – २ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मोदींकडून इस्रोचे कौतुक

News Desk