HW News Marathi
राजकारण

बेळगाव दौऱ्यासंदर्भात शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद; म्हणाले…

मुंबई | “बेळगाव दौरा रद्द झालेला नाही, हा दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतली”, अशी माहिती कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेतून दिली. शंभूराज देसाई यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बेळगावमध्ये उद्या (6 डिसेंबर) अभिवानदन करण्यासाठी बेळगाव (Belgaum) दौरा आयोजित करण्यात आला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांसह सोलापूर, अक्कलकोटवर दावा केला आहे. यानंतर राज्य सरकारचे कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे बेळगावमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. परंतु, या मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याच्या बातम्या माध्यमांतून येत होत्या. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाईंनी आज (5 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

 

बेळगाव दौरासंदर्भात शंभूराज देसाईंना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “आमचा दौरा अधिकृतपणे बेळगावमध्ये होणार आहे. यासंदर्भात आम्ही कर्नाटक सरकारला कळविले आहे. आम्ही कर्नाटक सरकारला आमच्या दौऱ्याची सविस्तर माहिती दिलेली नाही. आतापर्यंत तरी अधिकृत आम्ही बेळगाव दौरा रद्द केलेला संदेश किंवा कोणताही निर्णय कळविलेला नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांशी चर्चा करू. यानंतर ते जे निर्णय देतील त्या आदेशाचे आम्ही पालन करू”, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंनी दिले सडेतोड उत्तर

संजय राऊत टीका करत आहे की दोन्ही नेत्यांमध्ये हिंमत नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शंभूराज देसाई म्हणाले, “आमच्यामध्ये काय हिंमत आहे. हे संजय राऊतांना किंमान आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. आम्ही पाच महिन्यापूर्वी त्यांना दाखविलेले आहे. त्यामुळे आमची हिंमत काय आहे. आमच्या काय धमक आहे. आमच्या किती ताकद आहे. हे संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबाबत बोलू नये”, असा इशारा त्यांनी दिला आहे. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, “भाजप आणि शिवसेनेचे सरकार जे महाराष्ट्रात आहे. हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे सीमा भागातील भाषिकाचे, मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेणे. महाराष्ट्राकडून त्यांना काय अपेक्षा आहे. याबाबतीत आम्ही चर्चा करण्यासाठी बेळगावला जात आहोत. त्यामुळे कुणाच्या धमक आहे, कोणाच्यात नाही. हे नुसते बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझे ऐवढेच सांगणे आहे. जी तुमच्या काळात 2020 पासून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या सवलीत त्यांना राज्याकडून केली जाणार मदत जी थांबली होती. ती शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर तात्काळ सुरू करण्यात आली. तुम्ही केवळ बोलता आम्ही फक्त करून दाखवितो.”

 

 

Related posts

…म्हणून मी पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला !

News Desk

शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणारा छिंदम तडीपार असूनही विजयी

News Desk

#LokSabhaElections2019 : नीरव मोदीला अटक झाली यात तुमचे कसले यश ?

News Desk