HW News Marathi
राजकारण

माझ्यासोबत १० मिनिटे तुम्ही कोणत्याही मंचावर चर्चा करावी !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी आव्हान करतो की, माझ्यासोबत १० मिनिटे तुम्ही कोणत्याही मंचावर चर्चा करावी. परंतु ते माझ्यासोबत चर्चा करण्यास घाबरतात. मोदी हे एक ‘डरपोक’ व्यक्ती आहेत,” अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. दिल्लीत पक्षाच्या अल्पसंख्याक विभगाच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या आज (७ फेब्रुवारी) सभेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यावेळी राहुला यांनी मोदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. तसेच सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की मोदी समोरासमोर डिबेट करायला घाबरतात, कुणी त्यांना प्रश्न विचारायला थांबवले ते असे पळून जातात.

 

देशाच्या पंतप्रधानांनी जोडण्याची भाषा करायला हवी. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन हटवण्यात येईल, अशी टीका राहुल यांनी केली. २०१९ मध्ये काँग्रेस नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला हरविणार आहे, असे बोलून राहुल यांनी आरएसएसवर निशाणा साधला. यावेळी राहुल यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणादेखील दिल्या आहे. देशातील चौकीदार आज माझ्यावर रागावतात. तुम्ही आमची बदनामी करता, अशी मोदी तक्रार असते. मात्र मला देशातील चौकीदारांचा अपमान करायचा नाही. मी फक्त एकाच चौकीदाराबद्दल बोलतो, ज्याने चोरी केली आहे, असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला.

मोदींचा खरा चेहरा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशासमोर आणला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस नरेंद्र मोदी, भाजपा आणि संघाचा पराभव करेल, असे राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणादेखील दिल्या. देशातील चौकीदार आज माझ्यावर रागावतात. तुम्ही आमची बदनामी करता, अशी त्यांची तक्रार असते. मात्र मला देशातील चौकीदारांचा अपमान करायचा नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा काॅंग्रेसला पाठिंबा

News Desk

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

News Desk

राज ठाकरेंची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती! – मुख्यमंत्री

Aprna