HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी आज वायनाड दौऱ्यावर

वायनाड | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज (१७ एप्रिल) वायनाड दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल यांनी वायनाडमधील थिरुनेल्ली मंदिरात पूजा केली आहे. यावेळी राहुल यांनी वायनाडमधील जनतेला संबोधित देखील केले. “मी देशाच्या पंतप्रधानांसारखा नाही. मी इथे खोटे बोलण्यासाठी, किंवा तुमच्याशी तात्पुरते नाते जोडण्यासाठी मी इथे आलो नाही. मी तुम्हाला इथे माझी ‘मन की बात’ सांगण्यास नव्हे तर तुमच्या मनात काय सुरु आहे ते जाणून घेण्यास आलो आहे”, असे राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेला सांगितले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे २ मतदारसंघातून लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. लोकसभेची फेररचना झाल्यानंतर २००८ सालपासून वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. २००८ सालपासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. त्यामुळे केरळ काँग्रेस कमिटीकडून राहुल यांनी वायनाडमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात येत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“योग्य वेळी सर्व गोष्टी कळतील,” भुजबळांवर ठाकरेंचे सूचक विधान

News Desk

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk

एक ‘पगडी’ राजकारण महाराष्ट्रासाठी घातक सामनातून पवारांवर टीका

News Desk