HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी पळाले वायनाडला !

नवी दिल्ली | “अमेठीच्या पराभवाला घाबरून राहुल गांधी वायनाडला पळाले आहेत. कारण त्यांना माहित आहे कि आता त्यांचा टिकाव लागू शकणार नाही”, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लगावला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी हे २ मतदारसंघातून लढणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची अधिकृत माहिती रविवारी (३१ मार्च) काँग्रेसकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह बोलत होते.

“राहुल गांधी यांना अमेठीसह आणखी दुसऱ्या मतदारसंघातून लढावे लागत आहे. राहुल गांधी हे अमेठीतील पराभवाला घाबरुन वायनाडमध्ये पळाले आहेत. कारण, ते जाणतात कि आता अमेठीतून त्यांचा हिशोब चुकता केला जाणार आहे”, असे अमित शाह यावेळी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे राहुल आणि काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी धर्माचे गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप देखील अमित शाह यांनी केला आहे. “हिंदू दहशतवादी असू शकत नाहीत. मात्र, काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हिंदू धर्माला दहशतवादाशी जोडत हिंदूंना बदनाम केले. या प्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी”, अशी मागणीही अमित शाह यांनी केली आहे.

Related posts

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये २ जागांवरून वाद

News Desk

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk

भाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडेची टीका

News Desk