HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधी आज अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार

अमेठी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज (१० एप्रिल) काँग्रेसच्या पारंपरिक अशा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकी अर्ज भरणार आहेत. अमेठीमध्ये अर्ज भरण्याआधी राहुल गांधी रोड शो देखील करणार आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासचिव प्रियांका गांधी उपस्थित राहणार आहेत. हा रोड शो सकाळी १० वाजता मुंशागंजपासून सुरू होणार आहे. तर दुपारी १२.३० वाजता राहुल गांधी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अर्ज भरणार आहेत.

राहुल गांधी यांनी यापूर्वी गुरुवारी (४ एप्रिल) केरळमधील वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. अमेठीमधून भाजपच्या नेत्या स्मृती इराणीचे कडवे आवाहन राहुल गांधींना असणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या. तेव्हा राहुल गांधींना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Related posts

छत्तीसगढमध्ये भाजपने केली जाहीरनाम्याची घोषणा

Shweta Khamkar

पुढच्या कारवाईवेळी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना विमानाखाली बांधून न्यावे !

News Desk

वनगांच्या प्रचार रॅलीत अदित्य ठाकरे सहभागी

News Desk