HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राहुल गांधींचा अर्ज दाखल, वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

वायनाड | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (४ एप्रिल) केरळ येथील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांनी रोड शो करत शक्तीप्रदर्शन सुरुवात केली आहे. यावेळी त्यांच्या सोबत रोड शोमध्ये प्रियांका गांधी वॉडा सहभागी झाल्या आहेत.

राहुल गांधी यांनी अर्ज भरण्यासाठी जात असताना काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रोड शोला सुरुवात झाली आहे. या रोड शोमध्ये राहुल यांच्यासोबत पूर्व उत्तर प्रदेशाच्या महासचिव प्रियांका गांधी देखील सहभागी झाल्या आहेत. भाजपच्या वातीने राहुल गांधींच्या विरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष असलेल्या भारत धर्मा जन सेनेचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांना  निवडणूक लढविणार आहे.

वायनाड उत्तर केरळला लागून असून त्याच्या सीमा कर्नाटक आणि तमिळनाडूला जोडल्या गेल्या आहेत. वायनाड लोकसभा मतदार संघामध्ये वायनाड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील ३-३ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत आहे. कोझीकोडमधीलही एका विधानसभा मतदार संघाचाही वायनाड लोकसभा मतदार संघामध्ये समावेश होतो. या मतदारसंघात मुस्लिबहुल मतदारवर्गाची संख्या अधिक आहे. तर मतदार संघावर इंडियन यूनियन मुस्लिम लीगचेही चांगला प्रभाव येथे आहे.

Related posts

शिवसेनेचाही केजरीवाल यांना पाठिंबा

News Desk

अशोक गेहलोत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

News Desk

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk