HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी यांची आज मुंबईत जाहीर सभा

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज (१ मार्च) महाराष्ट्र दौऱयावर आहेत. धुळे आणि मुंबईत राहुल यांची जाहीर सभा होणार आहे. धुळ्यातील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी १ वाजता तर मुंबईत एमएमआरडीए मैदानावर संध्याकाळी ५ वाजता राहुल गांधी यांची सभा होणार आहे. या दोन्ही सभांसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राहुल गांधी यांच्या आजच्या महाराष्ट्र्र दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील या दोन्ही सभांनंतर आगामी निवडणुकांसाठीची पक्षाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितल्याप्रमाणे, राहुल गांधी यांची मुंबईतील जाहीर सभा दादर येथील शिवाजी पार्कमध्ये व्हावी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने राहुल गांधींच्या जाहीर सभेसाठी शिवाजी पार्क देण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर एमएमआरडीए मैदानावर जाहीर सभा होईल, असा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य काँग्रेसचे दिग्गज नेत या सभांच्या तयारीला लागले आहेत. जर प्रकाश आंबेकर आणि असदुद्दीन ओवेसी यांना शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळू शकते तर राहुल गांधी यांना का नाही ? असा प्रश्न संजय निरुपम यांनी विचारला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपाळ शेट्टी राजीनामा देणार का ?

News Desk

ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

News Desk

आज जंतरमंतरवर ममतांचे धरणे आंदोलन, पोस्टर्समधून टोला

News Desk