नवी दिल्ली | कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर कोण सत्ता प्रस्थापित करणार हा वाद रंगला असतानाही राजपालांनी निमंत्रण दिल्यामुळे कर्नाटकात भाजपचे येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून तुर्तास पदभार स्वीकारला आहे. परंतु त्यांच्याकडे कितीकाळ हे पद रहाणार हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात हरकत घेत कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती.
यावेळी निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सायंकाळ पर्यंत भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भाजपाने बहुमत सिद्ध केल्यास भाजपाची सत्ता कर्नाटकात रहाण्याची शक्यता आहे अन्यथा येडियुरप्पांना आपले पद सोडावे लागणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर ट्विट करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निर्णयासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणालेत, राज्यपाल वाला यांनी असंवैधानिक कृत्य केले आहे. या आमच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने पाठिंबा दिला आहे. बहुमत नसतानाही आम्ही सत्तास्थापन करू हा भाजपचा दावा न्यायालयाने खोडून काढला आहे. आता कायदेशीर मार्गाने थांबवल्यानंतर भाजपवाले पैसे आणि बळाचा वापर नक्की करतील, असे राहुल यांनी शुक्रवारी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Today’s Supreme Court order, vindicates our stand that Governor Vala acted unconstitutionally.
The BJP’s bluff that it will form the Govt., even without the numbers, has been called out by the court.
Stopped legally, they will now try money & muscle, to steal the mandate.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.