HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

राज ठाकरे-आशिष शेलार यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत एनआरसीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (३० जानेवारी) भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे निश्चितच राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभेनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. राजकीय वर्तुळात झालेल्या या प्रचंड मोठ्या उलथापालथीनंतर गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे आशिष शेलार यांच्या घेतलेल्या भेटी या सर्व चर्चांना पोषकच ठरल्या.

गेली २५ वर्षे भाजपसोबत असलेल्या शिवसेनेने यंदाच्या विधानसभेनंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली. राज्यातील या तीन पक्षांच्या महाविकासाआघाडीमुळे आता शिवसेनेने आपला कट्टर हिंदुत्त्ववाद बाजूला सारून सॉफ्ट हिंदुत्त्व स्वीकारले. शिवसेनेच्या याच नव्या सॉफ्ट हिंदुत्त्वाच्या भूमिकेमुळे अनेक शिवसैनिक नाराज असल्याची माहिती आहे. याच राजकीय संधीचा फायदा उचलत आता मनसेने आपल्या मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची कास धरली आहे. २३ जानेवारीला झालेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचप्रमाणे, राज्यात भाजप-मनसे एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षांकडून सध्या जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Related posts

औरंगाबादचे शिवसेनेवरचे प्रेम आटले का ?

News Desk

भाजपने मित्रपक्षांना जागा ‘दाखवली’ म्हणजे ‘दिली’, उद्धव ठाकरेंचा टोला

News Desk

पक्षात अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा विचार करावा लागेल !

News Desk