HW News Marathi
राजकारण

आज ईडीकडून होणार राज ठाकरे यांची चौकशी

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२२ ऑगस्ट) अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) कोहिनूर मिल प्रकरणात चौकशी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून मनसे नेते आणि कार्यकर्त्यांनाकलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. ईडीकडून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांची मंगळवारी (२० ऑगस्ट) पाच तास चौकशी करण्यात आली. तर काल (२१ऑगस्ट) राजन शिरोडकर ईडीसमोर हजर झाले. त्यांच्यासोबत उन्मेष जोशीही हजर असून त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे.

या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी निवेदन सोशल मीडियावर प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तत्पूर्वी, ठाणे शहरात पुकारण्यात आलेला बंद राज यांनी आवाहन केल्यानंतर मागे घेण्यात आला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही ईडीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमण्याचा दिलेला आदेश मागे घेतला.

 

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून हे आवाहन करतानाच प्रवीण चौगुलेंचाही उल्लेख केला आहे. “आपला सहकारी प्रवीण चौगुले यांच्या निधनाच्या बातमीने माझे मन व्यथित झाले आहे. मला ईडीची नोटीस आली, या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होते, असे सांगतानाच प्रवीणचे जसे माझ्यावर, पक्षावर प्रेम होते तसेच तुम्हा सगळ्यांचे माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे याची मला जाणीव आहे. पण माझी तुम्हा सर्वाना कळकळीची विनंती आहे की, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये. या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की,” असे राज यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह मध्य प्रदेशात देखील बसपा-सपा यांची आघाडी

News Desk

उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी

Seema Adhe

गरीबांचा विचार भाजप करत नाही | उद्धव ठाकरे

News Desk