HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे आज विधानसभा निवडणूकसंदर्भात जाहीर करणार निर्णय

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची आज (२० सप्टेंबर) बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत मनसे त्यांची विधानसभा निवडणुकी संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे विधानसभा निवडणूक न लढविण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. यामुळे आजची मनसेची बैठक महत्त्वाची मानली जाते.

मनसेने लोकसभा निवडणूक लढविली नव्हती, मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात प्रचार सभा घेतल्या होत्या. या सभेत राज ठाकरेंनी ग्राफिस आणि व्हिडिओच्या माध्यमातून मोदींचा विरोध केला होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मते द्या, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलेले नव्हते. यामुळे आघाडीत यांना सामील करून घेण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मनसे विधानसभेला किती जागा लढविणार? इच्छुक उमेदवारांच्या यादीची चाचपणी करण्याचे काम सुरू आहे. मनसे नेत्यांना उमेदवारांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज ठाकरेंनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. मनसे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर नक्की कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा ५६% निधी प्रसिद्धीवर खर्च

News Desk

राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा पेटंट मुद्दा नाही !

News Desk

भाजपच्या पहिल्या यादीत नाव नसूनही खडसेंकडून उमेदवारी अर्ज दाखल

News Desk