HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे विरोधी गोटात सामिल होणार ?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विरोधकांत सामिल होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या २१ फेब्रुवारीला ते पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

या मुलाखतीच्या निमित्ताने ठाकरे विरोधकांच्या आघाडीत शिरत आहेत का, अशा अर्थाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच गेल्या चार-सहा महिन्यांतील राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांमधूनही ते विरोधकांचीच भूमिका अधोरेखित करत भाजप किंबहुना मोदी-शहा जोडगोळीला लक्ष्य करत असल्याने या चर्चेला अधिकच जोर आला आहे.

राज काही दिवसांपूर्वी भाजपच्या चुकांवर टिपन्नी करत असल्याचे कार्टून काढून विरोधी गोटात जाण्याचे संकेत दिले होते. राज ठाकरे मोदी, संघ यांच्यावर टीका करून विरोधकांच्या भूमिकेत वावरत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कशी असतील राज्यातील समीकरणे ?

News Desk

मनसे नेते संदीप देशपांडेंवर अज्ञात इसमांकडून हल्ला; हाताला फ्रॅक्चर तर पायाला दुखापत

Aprna

सवर्ण आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यावर शंका | शरद पवार

News Desk