HW News Marathi
राजकारण

राज ठाकरे यांचा मोदी, फडणवीस यांच्यावर घणाघात

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यभर सभाचा धडाका सुरू केला आहे. १ मे ला त्यांची पहिली सभा विरार परिसरात झाली. यावेळी राज य़ांनी पतंप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन कुठल्याही प्रकारे होऊ देणार नसून नागरिकांनी बुलेट ट्रेन पटरी उखडून टाकण्याचे आवाहन केले. बुलेट ट्रेनसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ नका, यासाठी सरकारने जबरदस्ती केल्यास जे रूळ टाकले जातील ते उखडण्याचे काम तुम्ही करा. नवीन महाराष्ट्राचे स्वप्न पाहण्याचे महाराष्ट्रातील लोकांनी ओळखायला पाहिजे. बुलेट ट्रेनमुळे कुणाचे हित साधले जाणार. मोदींना बुलेट ट्रेनसाठी अहमदाबादचे नाव का सुचावे. ते देशाचे नव्हे तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. असे मी याचसाठी म्हणत आहे. जेव्हा पतंप्रधान आपल्या राज्याचा विचार करतात तेव्हा मी महाराष्ट्राच्या हिताचा विचार केल्यास त्यात वावगे काय ते असा सवाल राज यांनी या वेळी उपस्थित केला.

नाणार प्रकल्पाची गुजराती लोकांना माहिती कशी

गुजरातमधल्या लोकांना नाणारचा रिफायनरी प्रकल्प येणार हे आधी कसे कळले. कोकणातील माणलासा प्रकल्पाची माहिती मिळत नाही. याचा अर्थ आगोदर सांगतिले गेलेले आहे. आज तिच परिस्थिती होणार आहे. बुलेट ट्रेनसाठी जाणाऱ्या मार्गावर तेथील लोकांनी जमिनी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

मराठ्यांच्या मनगटातील ताकत कुठे गेली

बाहेरच्या लोकांना कशी नोकरी मिळते. कर्नाटक, तामिळनाडूचे पहा. गुजरातमध्ये पहा. कंत्राटी कामगार जरी घेतले तरी 85 टक्के कामगार स्थानिक घेतले जातात. महाराष्ट्रात असे का होत नाही. महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मनगटातील ताकद कुठे गेली. का तुम्ही असे गुळमुळीत झालात असा सवाल राजी यांनी उपस्थित केला.

मोदींनी परदेशातच स्थायिक व्हावे

मोदींनी लंडनला जावून आपल्या देशातील डॉक्टरांचा अवमान केला. तुम्ही तिकडेच राहत जात. इकडे आल्यानंतर पृथ्वीचा गोल घेऊन बसा, आता कुठे जायचे याची चिंता करता. दुसऱ्याच्या भूमित जावून तुम्ही आपल्या डॉक्टरांची इज्जत काढता. राफेलच्या संदर्भात मात्र मोदी काहीच बोलत नाहीत. भाजपवाली मंडळी समजून घ्या. माझ्या मोदींकडून खूप अपेक्षा होत्या. मोदी पंतप्रधान व्हावेत ही माझी पहिला मागणी होती. परंतु पतंप्रधान झाल्यानंतर हा माणूस बदलला आहे. मी पाहिलेले आजचे मोदी नाही. माणुसघाणा पंतप्रधान मी पाहिलेला नाही. कुणाशी बोलायचे नाही. मनाला वाटेले तसे निर्णय घ्यायचे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये शिवसेना नगरसेवकावर तरुणांकडून हल्ला

Gauri Tilekar

भाजपच्या पराभवासाठी शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात

News Desk

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk