HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आज नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली जाहीर सभा

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर भाजपविरुद्ध प्रचार करणार आहेत. राज ठाकरे राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी ८ ते ९ जाहीर सभा घेणार असल्याची माहिती माहिती मिळत होती. त्याप्रमाणे आता मनसेकडून अधिकृतरीत्या राज यांच्या दौऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या पुढच्या काही दिवसांसाठी आयोजित सभा आणि दौऱ्यांचा तपशील मनसेकडून देण्यात आला आहे. नांदेडमध्ये आज (१२ एप्रिल) होणाऱ्या आपल्या जाहीर सभेसाठी राज ठाकरे हे गुरुवारी (११ एप्रिल) रात्रीच देवगिरी एक्सप्रेसने मुंबईहून नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.

नांदेडमधील मुंडा मैदान, कृषी मार्केट येथे आज संध्याकाळी ५ च्या सुमारास राज ठाकरे यांची सभा पार पडेल. नुकत्याच मुंबईत झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध पुरावे देत पंतप्रधान मोदींवर आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आता नांदेडच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. यंदा नांदेड मतदारसंघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांचा सामना होणार आहे.

Related posts

आपच्या ४१ आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल

News Desk

भैय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच विश्वासू सेवकाला अटक

News Desk

प्रज्ञा सिंह प्रकरणी शिवेसना शांत का ? मिलिंद देवरा यांचा सवाल

News Desk