HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई | देशांत सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. राजकीय गणितांसाठी देशातील राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज (२० मार्च) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात १५ ते २० मिनिटे बंद दाराआड चर्चा चालली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील उपस्थित होते. दरम्यान, चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, मनसेने काहीच दिवसांपूर्वी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे अधिकृतपणे सांगितले आहे.

मंगळवारी (१९ मार्च) बांद्रयातील रंगशारदा सभागृहात मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी-शहाविरुद्ध देश अशी आहे. ही दोन माणसे जेव्हा बाजुला होतील त्यानंतरची लढाई ही खरी पक्षांमधील असेल”, असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. त्याचप्रमाणे मनसेच्या महाआघाडीत सामील होणाच्या चर्चांना देखील राज ठाकरेंनी यावेळी पूर्णविराम दिला आहे.

Related posts

शिवसेनेच्या महिला आघाडी-युवासेनेने अयोध्येत येऊ नये | ठाकरे

News Desk

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

News Desk

बेस्टच्या संपाचा आज पाचवा दिवस, बेस्ट कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

News Desk