HW News Marathi
राजकारण

फडणवीसांची तुलना थेट श्री रामाशी करून दिल्या भाजपच्या ‘या’ आमदाराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई | राज्यात स्तांतर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. फडणवीसांचा आज (22 जुलै) वाढदिवस आहे. वाढदिवसा निमित्ताने फडणवीसांवर शुभेच्छाचा वर्षावर होत आहे. यात भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी ट्वीट करत फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु, लाड यांनी फडणवीसांची तुलना ही थेट प्रभू श्री रामा यांच्याशी केली आहे.

लाड यांनी फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोत फडणवीसांच्या खांद्यावर शाल असून लाड फुलांचा गुच्छा देत असून त्यांचा सत्कार करत असल्याचे दिसत आहे. लाड यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “प्रभू रामाला माझे विनम्र अभिवादन. जसे भगवान रामाशिवाय हनुमान अपूर्ण आहे, तसाच मीही…माझे प्रभू रामाच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. जय श्री राम जय बजरंग बली.#HappyBirthdayDevendraji, ” असे हॅशटॅग दिले गेले आहे.

फडणवीस यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. लाड यांनी अजित पवार यांना सुद्धा ट्वीट करत वाढ दिवसांच्या शुभेच्या दिल्या आहेत. लाड यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मा. अजितदादा पवार आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो, याच सदिच्छा!”, असे त्यांनी ट्वीट केले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप हा बुडणारं जहाज | अशोक चव्हाण

News Desk

भगवानगडाला शह देण्यासाठी सावरगावला भगवान बाबांचे नवे स्मारक उभारणार | पंकजा मुंडे

News Desk

मानहानी प्रकरण: राहुल गांधी शिक्षेविरोधात सूरत न्यायालयात याचिका दाखल करणार

Aprna