HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राज ठाकरे महाआघाडीसाठी हातकणंगले-सांगली मतदारसंघात घेणार सभा ?

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ मार्च रोजी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. दरम्यान, शनिवारी (३० मार्च) मनसेकडून आपण महाराष्ट्रभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले, तर विशाल पाटील यांच्यासाठी सांगली मतदारसंघात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज ठाकरे यांच्या सभेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने हातकणंगले व सांगली हे दोन्ही मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची या दोन मतदारसंघांमध्ये राज ठाकरे यांच्या सभा होण्याबाबत चर्चा सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे देखील या दोन्ही मतदारसंघात सभा घेणार आहेत.

Related posts

लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट

News Desk

गुजरातमध्ये शिक्षणाचा व्यापार | हार्दिक पटेल

News Desk

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk