HW News Marathi
राजकारण

डीजे वादकांना राज ठाकरेंचा पाठिंबा

मुंबई | गेल्या एक दोन वर्षांपासून डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि नवरात्री मध्ये डीजेचा आवाज बंद होता. त्यामुळे वैतागून डीजे वादकांनी शेवटी आज महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

डीजे वादकांनी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. यावेळी डीजेवर बंदी नसल्याचा दावा डीजे वादकांनी ठाकरे यांच्यासमोर केला. यावेळी डीजे वादकांनी राज ठाकरे यांच्या समोर आपली व्यथा मांडली. आणि डीजे चालकांच्या पाठीशी उभं राहण्याची विनंती केली. यावेळी राज ठाकरे यांनी डीजे चालकांची व्यथा ऐकल्यानंतर त्याना पाठींबा देणार असल्याच आश्वासन दिल्याचा दावा डीजे चालकांनी केला आहे.

डीजे बंदीमुळे बेंजो आणि नाशिक ढोलला भाव –

गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवादरम्यान पूर्वी डीजेला बढती होती. पण डीजेवर बंदी आल्यानंतर बेंजो आणि नाशिक ढोलला अच्छे दिन आले आहेत. पाहिले डीजेचे भाव गगनात होते. पण आता बेंजो आणि नाशिक ढोलला मागणी वाढली आहे. बेंजो वादक ४० हजार ते ५० हजार रुपये घेतात. तर नाशिक ढोल वादक ३० हजार ते ४० हजार रुपये घेतात. आणि डीजे वादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी शेवटी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

News Desk

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला घराण्यांची परंपराच माहिती नाही, त्यांनी घराण्यांचा मान ठेवला नाही !

News Desk

गणपती बाप्पा ‘ईडी’चे विघ्न नक्कीच दूर करेल !

News Desk