नवी दिल्ली | दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत आप सरकारने मंजूर केला आहे. या वादादरम्यान आप नेत्या अलका लांबा यांची गच्छंती करण्यात आली आहे. लांबा यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला आहे. त्यांचे पक्षातील सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. अलका लांबा यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. यामुळे लांबा यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सोमनाथ भारती यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. सोमनाथ भारती यांना पार्टीच्या प्रवक्तेपदावर हटवण्यात आले आहे. संबंधित प्रस्ताव आपणच दिल्याचा दावा सोमनाथ भारती यांनी केला आहे. या प्रस्तावामध्ये राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घेण्याची मागणी करण्यात आली होती.
AAP seeks Alka Lamba's resignation after differences over resolution to revoke Rajiv Gandhi's Bharat Ratna
Read @ANI Story | https://t.co/qUZRcImSnH pic.twitter.com/Sk95TBMqgV
— ANI Digital (@ani_digital) December 21, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.