HW News Marathi
राजकारण

काँग्रेस सरकारच्या काळात ६ सर्जिकल स्ट्राईक | राजीव शुक्ला

नवी दिल्ली | युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये सहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा काँग्रेसने आज (२ मे) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केला आहे. शुक्ला यांनी म्हटले की, युपीए सरकारने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली आहे. शुक्ला यांनी केलेल्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्ये सर्जिकल स्ट्राईकवरून राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये सहा वेळा, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक झाल्याची माहिती शुक्ला पत्रकार परिषदेत सांगितले. मोदी सरकारला लक्ष्य करून त्यांच्यावर निशाणा साधला आणि फक्त एका सर्जिकल स्ट्राईकच्या जोरावर आपलीच पाठ थोपटून घेत असल्याची टीकाही शुक्ला यांनी केली. मात्र मनमोहन सिंग सरकारने भाजपप्रमाणे सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले नाही, असे टोलाही शुक्लांनी मोदींना लगावला. आम्ही आखलेल्या योजनांना लक्ष्यापर्यंत पोहोचवणारे आहोत, परंतु त्याची गाथा गात बसत नाही. परंतु विद्यामान सरकार निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीदरम्यानही यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेदरम्यान शुक्ला यांनी युपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा आणि ठिकाणांची माहिती दिली. पहिला सर्जिकल स्ट्राईक १९ जून २००८ पुंछ येथील भटकल पुंजमध्ये, दुसरा ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०११ शारदा सेक्टरमध्ये, तिसरा ६ जानेवारी, २०१३ सावन पत्र चेकपोस्टमध्ये, चौथा २७ ते २८ जुलै २०१३ नाजपीर सेक्टरमध्ये, पाचवा ६ ऑगस्ट २०१३ निलम व्हॅलीमध्ये आणि सहावा १४ जानेवारी २०१४ ला करण्यात आला. तात्कालीन लष्करप्रमुख बिक्रम सिंह यांनी २३ डिसेंबर २०१३ एका सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेखही केला होता, असेही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालु प्रसाद यादव यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता नाही, आणखी एका प्रकरणात दोषी

News Desk

नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन अपक्ष आमदारांनी आणला अविश्वासाचा प्रस्ताव

Aprna

सुशीलकुमार शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे !

News Desk