HW News Marathi
राजकारण

राम कदम यांची जीभ छाटणाऱ्याला पाच लाख रुपये | सुबोध सावजी

बुलडाणा | भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच आता बुलडाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राम कदमांबाबत चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. राम कदम यांची जीभ छाटून आणा आणि पाच लाख रुपये घेऊन जा, असं वक्तव्य सुबोध सावजी यांनी केले आहे.

राम कदम यांच्या या वक्तव्यावर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राम कदम यांच्याविरोधात संताप उफाळला आहे. अनेकांनी राम कदम यांच्यावर तोंडसुख घेतले, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन त्यांच्या प्रतिमेचं दहन केले. जोडेमारो, बांगड्यांची माळ, चपलेचा हार अशा सर्व मार्गांनी चीड व्यक्त केली. आता सुबोध सावजी यांनी राम कदम यांची जीभ छाटून आणणाऱ्याला पाच लाख रुपयांच बक्षीस जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मविआ’सारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढतोय!

Aprna

विरोधी पक्ष नेत्यांची वाढलेली जवळीक ठरणार भाजपच्या धास्तीचे कारण

News Desk

गोव्यात काँग्रेसला मोठी गळती! 11 पैकी 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

Aprna