मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतीदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथे मोठ्या संख्येने येतात. स्मृतीदिना निमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येमध्ये लाखो शिवसैनिक जावून राम मंदिराविषयी ठाम भूमिका घेणार आहेत .त्यामुळेच या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे वाळू पासून बनवलेल्या कलाकृतीत राम मंदिराचे चित्रकृती साकारली आहे.
त्यामुळे न कळत हे पाहता शिवसैनिकाना हा मुद्दा लक्षात राहावा यासाठी की काय ? बाळासाहेब यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी बनवलेल्या रेतीचा अभिवादन कलाकृती शेजारीच बाजूला राम मंदिराचे शिल्प साकारण्यात आले आहे. महाराष्ट्रातून शिवतीर्थावर लाखोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा राम मंदिराचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या ठिकाणी साखरण्यात आलेले वाळूचे शिल्प सर्वांसाठी लक्षवेधी असणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.