नवी दिल्ली | ‘राम मंदिर हा भाजपचा पेटंट मुद्दा नाही. अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. राम मंदिर हा कोणत्याही एकाच पक्षाचा मुद्दा होऊ शकत नाही’, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे आणि त्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे उमा भरती यांनी कौतुक केले आहे. ‘समाजवादी पक्ष, बसप, अकाली दल, एमआयएम नेते ओवेसी आणि आझम खान या सर्वांनी देखील राम मंदिर प्रकरणी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत’, असे आवाहन देखील उमा भारती यांनी आहे.
Yes, I appreciate #UddhavThackeray for his effort. BJP doesn't have a patent on Ram Mandir, Lord Ram is of all. I appeal to everyone including SP, BSP, Akali Dal, Owaisi, Azam Khan etc to come forward and support the construction of the temple: Uma Bharti, Union Minister (25.11) pic.twitter.com/LQcpPafdBR
— ANI (@ANI) November 26, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमा भरती बोलत होत्या. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात घोषणा केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे शनिवारीच (२४ डिसेंबर) अयोध्येत दाखल झाले होते. दरम्यान शनिवारी रात्रीच सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच शिवसैनिकांना मात्र महाराष्ट्रात परतण्याचे आदेश शिवसेनेच्या ज्येष्ठ नेतृत्वाकडून देण्यात आले. उद्धव ठाकरे मात्र रविवार दुपारपर्यंत अयोध्येत होते. उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा अवघ्या २४ तासांमध्ये संपला आणि ते मुंबईला परतले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.