नागपूर | अयोध्येमधील त्या जागेवर राम मंदिरच होते. ती भूमी रामल्लाचीच आहे. तिथे करण्यात आलेल्या उत्खननातून मंदिराचे अवशेष सापडले आहे. न्यायालयीत प्रक्रियेला उशीर होत आहे. त्यामुळे अयोध्येतील त्या जागी मंदिर बनवण्यासाठी सरकारने कायदा करावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. तसेच राम मंदिराच्या कायद्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहानही मोहन भागवत यांनी केले. विश्व हिंदू परिषदेने बोलावलेल्या हुंकार सभेला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित करताना बोलत होते.
Agar kisi karan apni vyastata ke karan ya pata nahi apne samaj ke samvedana ko na janne ke karan nayalaya ki prathmikta nahi hai,to sarkar soche ki is mandir ko banane ke liye kanoon kaise aa sakta hai aur shighr is kanoon ko laye.Yahi uchit hai:RSS Chief Mohan Bhagwat #RamTemple pic.twitter.com/hsj9KAehkV
— ANI (@ANI) November 25, 2018
“हा देश रामाचा आहे. बाबर आपल्या देशाचा नव्हता, राम आपला आहे. त्यांचे मंदिर बनणार नाही तर कसे होणार. हिंदू समाज सर्वांचा आदर करतो. म्हणूनच ३० वर्ष लागत आहेत. राम जन्मभूमीबाबत न्यायालयाची प्राथमिकता आहे,असे वाटत नाही. सर्वाना वाटते मंदिराचे काम सुरु व्हावे. पण साधी सुनांवणी सुरु होत नाही.जनहितासाठी हा मुद्दा टाळत राहणे योग्य नाही.’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.