HW News Marathi
राजकारण

RamMandir : अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त

लखनऊ | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २४ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्येत सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावपूर्ण स्थिती आहे. एखादी अनुचित प्रकार घडण्याची होण्याची भीती व्यक्त केली आहे. विशेषत: रामजन्मभूमी परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच राम मंदिराच्या मुद्यावर हिंदू संघटनांकडून सभांचे सत्र सुरू आहेत. अयोध्येमध्ये रविवारी विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेच्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रश्नी सुनावणी जानेवारीपर्यंत पुढे ठकली असतानाही या मुद्यावरून हिंदू संघटनांकडून सभांचे सत्र सुरूच आहे.

तसेच अयोध्या आणि फैजाबाद येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या सभेला येथील व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यापुर्वीच मोठा झटका बसला असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभेला परवानगी नाकारली आहे. राम मंदिर निर्माणावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच खंडजगी सुरू आहे.

अयोध्येमध्ये हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली होती. यामुळे बरेच दिवस अयोध्येत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती होईल, अशी भीती व्यापाऱ्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk

‘२०२२ पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलणार’

Gauri Tilekar

वन खात्याचे नाव बदलून शिकारी खाते असे करायला हवे!

News Desk