लखनऊ | अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात राजकारण चांगलेच तापले आहे.’आम्ही १७ मिनिटांमध्ये बाबरी मशीद तोडली मग कायदा बनवायला किती वेळ लागतो ?’, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रपती भावनपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाजपचे सरकार आहे. राज्यसभेत असे अनेक खासदार आहेत जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील आणि जे विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे देखील कठीण होईल, असा धमकी वजा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
Humne 17 minute mein Babri tod di, to kanoon banane mein kitna time lagta hai?Rashtrapati Bhawan se lekar UP tak BJP ki sarkar hai. Rajya Sabha mein aise bahot sansad hai jo Ram mandir ke saath khade rahenge,jo virodh karega uska desh mai ghumna mushkil hoga:Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/62zlo0eZJ5
— ANI (@ANI) November 23, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील २५ नोव्हेंबरला अयोध्येत दाखल होणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असतानाच संजय राऊत यांच्या या विधानामुळे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.