HW News Marathi
राजकारण

#RamMandir : राम मंदिर नको विद्यापीठ उभारा !

नवी दिल्ली। राम मंदिराचा मुद्दा देशभरात चांगलाच गाजत आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सर्वच पक्ष आणि हिंदू संघटना त्याविषयी भाष्य करत आहेत. परंतु दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या याबाबतच्या वक्तव्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जागेवर भव्य मंदिर उभारल्यानं रामराज्य येणार नाही. तर त्या जागेवर एक विद्यापीठ उभारण्यात यावे. शिक्षणानेच देशात रामराज्य येईल”, असे मनीष सिसोदिया म्हणाले आहेत.

मनीष सिसोदिया यांनी एका कार्यक्रमात बोलताना हा विचार मांडला. या कार्यक्रमात सिसोदिया यांना आम आदमी पार्टीची राम मंदिराबद्दलची भूमिका विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी विद्यापीठ उभारण्याची कल्पना मांडली. विद्यापीठात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि परदेशी असे सर्व प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. या कार्यक्रमात बोलताना मनीष सिसोदिया यांनी जातीय राजकारण आणि शिक्षणावर भाष्य केले.

सध्या इतर देशांमध्ये काय सुरू आहे आणि आपल्याकडे नेमकं काय चाललं आहे. याचाही विचार व्हायला हवा, असेही मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. ‘मी नुकताच जपानला गेलो होतो. तिथे हायड्रोजनवर चालणाऱ्या कारवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी आपल्याकडे हनुमानाची जात कोणती, यावर राजकारण सुरू होते. हे खूपच निराशाजनक आहे. ही परिस्थिती केवळ शिक्षणामुळेच बदलू शकते,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

News Desk

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

Aprna

विधान परिषदेत ‘मविआ’च्या पदरी निराशा; मलिक, देशमुख मतदानापासून वंचित

Aprna
मनोरंजन

#IndianNavyDay : … म्हणून साजरा केला जातो ‘नौदल दिन’

News Desk

भारतीय नौदलाला १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजय मिळविणे भारताला अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला. या दिवसाला ‘नौदल दिन’ म्हणून संबोधले जाते. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून करण्यात येते.

४ डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजे भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. १९७१ साली भारताच्या नौदलानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कामगिरीचं नाव होतं ऑपरेशन ट्रायडण्ट. ४ डिसेंबरला ही कामगिरी यशस्वी झाली. या कामगिरीला सलाम म्हणून भारतीय नौसेना नेव्ही डे साजरा करते.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या ताफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

Related posts

आश्विन अमावस्येलाच का होते लक्ष्मीपूजन !

News Desk

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

News Desk