HW News Marathi
राजकारण

RamMandir : भाजप जो विचार करते, तोच विचार शिवसेनाही करत आहे !

अयोध्या | ‘राम मंदिर उभारण्याच्या हेतूने उद्धव ठाकरे अयोध्येला गेले असतील तर त्यात काहीच गैर नाही. यात स्पर्धा किंवा कुरघोडीचा प्रश्नच येत नाही’, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भाजप जो विचार करते, तोच विचार शिवसेनाही करत आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा ज्यासाठी आग्रही आहेत, त्याचसाठी उद्धव ठाकरेही आग्रही आहेत. आमच्या विचारात समानता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच राम मंदिर हा राजकारणाचा विषय नसून कोट्यवधी जनतेच्या मनातील इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राम मंदिर हा राष्ट्रकारणाचा मुद्दा आहे. तो कोणत्याही एका पक्षाचा विषय नसून सर्वपक्षीयांची बैठक घेऊन एकमत केले पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होय मी बंडखोर !

News Desk

पश्चिम बंगालमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त | ममता बॅनर्जी

News Desk

दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही

News Desk