HW News Marathi
राजकारण

रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते सध्या पक्षाला रामराम ठोकत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आज (१३ सप्टेंबर) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (१२ सप्टेंबर) संध्याकाळी फलटण येथील आपल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१३ सप्टेंबर) होणाऱ्या बैठकीनंतर रामराजे नाईक निंबाळकर याबाबतची अधिकृत घोषणा करतील. त्याचप्रमाणे, राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या संपर्कात होते. मात्र, ते उदयनराजेंची भूमिका स्पष्ट होण्याची वाट पाहत होते. उदयनराजेंचा निर्णय होईपर्यंत त्यांनी आपला देखील निर्णय राखून ठेवला होता. कारण, उदयनराजे आणि रामराजे यांच्यात मोठा संघर्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडून जर हे दोन्ही नेते पुन्हा एकाच पक्षात गेले तर आणखी मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उदयनराजेंनी आपला भाजपप्रवेशाचा निर्णय निश्चित केल्यानंतर आता रामराजे शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…अॅमेझॉनचे पार्सल परत पाठवले”, उद्धव ठाकरेंचा भगतसिंग कोश्यारींना टोला

Aprna

EXIT POLL : तेलंगणातील जनतेचा कौल टीआरएसच्या बाजूने, भाजपची घोर निराशा

News Desk

सेनेचे नेते सुरेश कालगुडेंच्या अपघाती मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल

News Desk